Wednesday, August 13, 2008

सिनेमाच्या दिवसांच्या पोस्ट लिहिता लिहिता लक्षात आलं की, या विषयावर स्वतंत्र ब्लॊगच चालू करावा म्हणून मोठ्या उत्साहात सगळे सोपस्कार तर पार पाडले, ब्लॊगचं बाळंतपण करून बारसंही पार पडलं आणि गाडं इथेच थांबलं. कारणं सांगायची तर यादी मोठी आहे. त्यामुळी ती देतच नाही. सरळ ब्लॊग लिहायला सुरवात करते; पण आत्ता नाही. अजून दोन चार दिवसांनी, चांगला मुहूर्त बघून. बघा तुम्हालाही सापडला तर मला कळवा. सध्या सायोनारा. वादा निभाऊंगी, सायोनारा!

No comments: